(आमचा पत्ता - संपादक, दैनिक नवप्रभा,
नवहिंद भवन, पणजी गोवा 403001. दूरध्वनी क्र. 0832
- 6651113. संपादक - श्री. परेश प्रभू संपर्क | Copyright 2011. Navhind
Papers & Publications)
वन्य प्राणी म्हणती आम्ही मित्र
मानवाचे!
Published on: December 12, 2011 - 11:03
वन्यप्राणी आणि माणूस यांच्याधील संघर्ष कशामुळे !
वन्य
प्राणी आणि मानव संघर्षाची ही समस्या पूर्वी नव्हती. परंतु दिवसेंदिवस ही समस्या अधिक
गंभीर का बनत आहे, यावर
प्रभावी विचार वेळीच होणे अत्यंत गरजेचे आहे.
शेती व उद्योगधंदाच्या
विस्तारासाठी तसेच नद्यांच्या प्रकल्पासाठी जमीनीची मागणी सारखी वाढत राहिल्यामुळे
वनांचा सतत नाश होत आहे. आज गावागावात दिसत असलेली ही वनराई पूर्वजांनी सातत्याने
केलेल्या वृक्षसंवर्धनाची जाणीव करुन देतात. परंतु आज वनांचा-हास होतो आहे आणि
वृक्षसंवर्धनाची जागा अतिक्रमणे, अनिर्बंध तोडणे,
वणवे आणि अनियंत्रित चराई यांनी घेतली आहे. अद्यापही आपल्या देशांत
इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. जळावू लाकूडासाठी प्रामुख्याने
जंगलांवरच अवलंबून रहावे लागते व बेसुमार जंगलतोड झाली, डोंगरांचे
खाणींसाठी उत्खनन झाले.
वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. बिबटे वाघ, गवे रेडे, रानडुक्कर, मोर, माकडे,
हत्ती आदी वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालण्याचे
प्रकार प्रामुख्याने पेडणे, डिचोली, सत्तरी,
सांगे या तालुक्यांतील अनेक गावांत घडले आहेत. वन्य प्राण्यांनी
मानवावर हल्ले करण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत घबराटीचे
वातावरण निर्माण होण्यापेक्षाही शेती-बागायती पिकांची जी मोठी हानी झाली त्याची
भरपाई कोण करणार?
जंगले उद्ध्वस्त करणे, खाणीसाठी डोंगराचे उत्खनन करणे, वाढत्याबांधकामांमुळे
वनराईवर आक्रमण करणे आदी गोष्टींमुळे वनसंपत्ती नष्ट झाली. नैसर्गिक संपत्ती संपत
चालली. जलस्त्रोत कमी झाले. पर्यावरण बिघडले. प्रदूषण वाढले आणि म्हणूनच
वन्यप्राण्यांची घुस्मटमार झाली अन् होत आहे. अशा परिस्थितीत तहान, भक्ष्य, निवारा यांच्या शोधार्थ त्यांनी जायचे कुठे,
असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगी व
वणवे : जेथे
वरचेवर आगी लागतात अशा वनक्षेत्रात काही विशिष्ट जातीची झाडे असणारी वनेच आढळतात.
वणवे लागल्यामुळे झाडांची वाढ खुंटते व लाकडात दोष निर्माण होतात.
मानवाने स्वाताच्या स्वार्थासाठी वन्य प्राण्यांची वस्ती उधवस्त केली त्यामुळे मानवी वस्तीवर वन्य प्राण्यांचे हल्ले
एवढे वाढले आहे की, आता ती एक गंभीर समस्या बनलेली आहे. मानवी जीवन आणखी धोक्यात येण्याची
शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या मानव निर्मित आहे. राना-वनात वास्तव्य करणा-या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात
आल्याने त्यांनी मानवी वस्तीत निवारा शोधण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
राज्यात बिबट्या वाघांचा वावर वाढला आहे.
डिचोली तालुक्यात १०-१५ बिबटे विविध गावांत वावरत होते. त्यांनी गेल्या वर्षभरात
मानवी वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या व त्यांचा फडशा
पाडण्याच्या किमान २५-३० तरी घटना घडल्या. असे प्रकार पेडणे तालुक्यातही कमी अधिक
प्रमाणात झालेले आहेत. वन खात्याचे अधिकारी व प्राणीमित्र अमृतसिंग यांनी डिचोली
तालुक्यात विविध ठिकाणी सापळे लावून ८ बिबटे पकडले. नंतर त्यांना त्यांच्या वस्तीत
नेऊन सोडून देण्यात आले. दोनशे-तीनशे किलोमीटर क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो.
त्यामुळे गोव्याच्या सीमेपलीकडे रानात त्यांना सोडले तरी ते पुन्हा येऊ शकतात.
बिबट्या वाघाने माणसावर हल्ला करण्याचे प्रकार त्या मानाने कमी घडले आहेत. तथापि, गाईची वासरे, कुत्रे, मांजरे यांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे.
कर्नाटकातून आलेल्या तीन हत्तींनी पेडणे तालुक्यातील
इब्रामपूर, हणखणे, डिचोली तालुक्यातील साळ, वडावल, पिर्ण, मेणकुरे,
धुमासे, अडवलपाल या गावात घुसून शेती-बागायतीची
प्रचंड प्रमाणात नुकसानी केली. आजतागायत त्या नुकसानग्रस्त शेतक-यांना
सरकारकडून कवडीचीही भरपाई मिळालेली नाही. गेल्या वर्षभरात मात्र हत्तीपासूनची भीती
कमी झालेली आहे. साखळी, डिचोली, पेडणे
या भागात गवे रेडे घुसण्याच्या घटना घडल्या. रानडुकरांनी बागायतीवर
अतिक्रमण करून पिकांची नासाडी केली. पेडणे भागात माकडे बिनदिक्कतपणे मानवी वस्तीत
वावरतात. तेथील केळी व इतर पिकांचे ही माकडे फारच नुकसान करतात. हाच प्रकार आता
डिचोली तालुक्यातही पहायला मिळतो.
पूर्वी कोल्हे दिसायचे. कोल्हे पळाले
आणि मोर आले. मयुरनृत्य पहायला बरे वाटते. पण नेत्रसुख देणारे त्यांचे
मयुरनृत्य आता महागडे ठरले आहे. कारण मोरांनी भाजी पिकांवर ताव मारण्यासाठी
जंगलातून मानवी वस्तीकडे प्रस्थान ठेवले आहे. या सर्व बाबींचा विचार करता, वन्य प्राण्यांमुळे मानवी
जीवनाला धोका नि नुकसान संभवते. पण त्याच्यावर कारवाई कोण करणार? वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये त्यांना संरक्षण आहे. फक्त कायद्याने
आहे, तेवढेच! कायदा हातात घेऊन त्यांची होणारी हत्या कोण
थांबवणार? वाघांना मारले तरी तो वाघोबा नव्हता,
ती डरकाळी नव्हे, कोल्हेकुई होती असे
वातावरणनिर्मिती करणारेच वाघ बनले आहेत. वन संपत्ती नष्ट करणे, तिचा वाढता -हास न थांबविणे ही प्रवृत्ती अत्यंत घातक ठरली आहे. वन्य
प्राण्यांना त्यांचे जीवन आपण आरामात जगू दिले नाही तर, मानवी
जीवनात रामच राहणार नाही.
वन्य प्राणी म्हणती आम्ही मित्र
मानवाचे!
विचारमंथन व उपाययोजना
सध्या वन्य प्राणी आपल्या जीवन अस्तित्वासाठी
संघर्ष करीत आहेत. हा संघर्ष सध्या सीमित आहे, तो आणखी वाढला तर, त्याचा
धोका मानवांनाच अधिक आहे ही गोष्ट ध्यानात घेऊन उपाययोजना व्हायला हवी. त्याकरीता
समस्या निर्मितीमागची कारणे शोधून त्यावरती उपाय करण्याची आवश्यकता आहे.
पकडलेल्या वन्य प्राण्यांना वनखाते दुस-या
वन्यप्राणीवस्तीत सोडून देते. पण हा त्यावरती उपाय नव्हे. वन संपत्तीचे जतन करणे, नवी वनराई निर्माण करणे,
डोंगर माथ्यावर ( शिल्लक राहिलेल्या) जंगली झाडांची लागवड करणे या
गोष्टी युद्धपातळीवर व्हायला हव्यात. भविष्यात काही गोष्टी उलटल्यानंतर का होईना,
वन्य प्राण्यांना निवार्यासाठी वने उपलब्ध होतील.
बेसुमार भूउत्खनन, बेकायदेशीर व्यवसाय थांबायलाच
हवेत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व्हायलाच हवे. रानडुक्करांची शिकार करण्याची चटक
लागलेले लोक फासे लावतात. त्या फाश्यात रानडुक्कराऐवजी बिबटे अडकून पडल्याचे काही
प्रकार उघडकीस आले आहेत. ही बेकायदेशीर हत्या थांबवणे गरजेचे आहे.
बेकायदेशीर वन्य प्राण्यांची हत्या करणारे
आपल्या कृत्याचे समर्थन करतात. ते म्हणतात, पूर्वी शिकारीसाठी भोंवड्या काढल्या
जायच्या, त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीपासून दूर पळायचे.
आता भोंवड्या बंद झाल्या म्हणून वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसतात. काय हा
युक्तीवाद!
वन्यप्राणी व मानव यामधील वाढता संघर्ष दोन्ही
घटकांना हानीकारक आहे. दोन्ही घटकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे. म्हणून वरकरणी
क्षुल्लक वाटणा-या या विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचारमंथन व्हायला हवे.
हे विचारमंथन वन्य प्राणी करू शकत नाहीत. ते सामाजिक प्राणी म्हणून संबोधल्या जाणा-या
मनुष्यानेच करायला हवे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
वनचरे... भावनेने वृक्षांकडे पाहिले जायचे. आज ती दृष्टी लयास जात आहे. वृक्षतोड
करून किती पैसा जमवता येईल हा व्यवहारी दृष्टीकोन ठेऊन आपण कृती करतो. वन्य
प्राण्यांना ते प्राणी आहेत, त्यांचेही कुटुंब जीवन आहे, ही
दृष्टी ठेऊन त्यांना संरक्षण देण्याऐवजी आपण त्यांची हत्या करून विक्री करतो,
केवळ धन-द्रव्याच्या हव्यासापायी...! हे सारे कितपत योग्य, जीवनपोषक आहे? हे तर जीवन शोषक आहे. प्रत्येक जीव,
प्राणीमात्र स्वतःवरती प्रेम करतो. वन्य प्राणीही त्याला अपवाद
नाहीत. हे आपल्या लक्षात यायला आपण आपली मानसिकता बदलायला हवी. तसे झाले तर,
वन्यप्राणी-मानवी संघर्ष समस्येतून वन्यप्राण्यांची आणि मानवाची
सुटका होईल.
प्राणी
सृष्टी : वन्य
प्राणी, पाळीव−पशू
व मानव :
वनांची उपज व वाढ, सुस्थिती, रचना व प्रकार या सर्वांवर तेथे वावरणारे
वन्य प्राणी व पाळीव पशू यांचाही प्रभाव पडतो. वनांवर प्रभाव पाडणाऱ्या घटकांत
मानवी संपर्काला फार महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल. अयोग्य रीतीने मानवाने वनांचा
वापर केला, तर वनांचा विध्वंस होतो.
वरील
सर्व घटकांच्या प्रभावावर वनांची रचना, प्रकार व सुस्थिती अवलंबून
असते. या सर्व घटक-समुच्चयाला वनविद्येत ‘स्थानीय घटक’
या ढोबळ नावाने संबोधिले जाते. जीवसृष्टीत प्राण्यांप्रमाणेच
वनस्पतींतही वाढीसाठी आपसात संघर्ष चालू असतात व विशिष्ट स्थानीय घटकांच्या
प्रभावाखाली जगण्यासाठी व वाढीसाठी या वृक्ष-वनस्पतींत विशिष्ट प्रकारचे गुणधर्म
निरनिराळ्या समायोजनांच्या रूपाने आढळतात. अशा रीतीने स्थानीय घटक व समायोजने
यांच्या रूपाने आढळतात. अशा रीतीने स्थानीय घटक व समायोजने यांच्या संयुक्त
प्रभावांनुसार विविध क्षेत्रांत निरनिराळे वन-प्रकार आढळतात.
वनांचे
कार्य व उपयुक्तता : वने
ही केवळ मानवी जीवनात समृद्धीची व संपत्तिनिर्मितीची साधनेच नव्हते. वनांचे याहून
महत्त्वाचे कार्य म्हणजे वने निसर्गाचा समतोल राखून मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त
करून देतात. जेथे वनांचा प्रचंड प्रमाणावर विध्वंस झाला, त्या प्रदेशात वाळवंटे व दुष्काळ निर्माण होऊन तेथील संस्कृतीच नष्ट
झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात.

वनांमुळे स्थानिक जलवायुमानावर निश्चित परिणाम होतो. उन्हाळ्यात वनाच्छादित प्रदेश सापेक्षतेने थंड व शीतकाळात सापेक्षतेने उबदार असतात. वनातील झाडांची दाटी, तेथील झाडांच्या पानांची रचना यांनुसार कमीअधिक प्रमाणात हा फरक घडतो. वनप्रदेशातील जमिनीचे दिवसा सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण होते. रात्रीच्या वेळी झाडांच्या आच्छादनामुळे ही जमीन उघड्या माळावरील जमिनीप्रमाणे लवकर थंड होत नाही. त्यामुळे वनप्रदेशात हवेचे व जमिनीचे महत्तम तापमान उघड्या भूभागापेक्षा कमी व किमान तापमान उघड्या जमिनीपेक्षा जास्त असते, असे प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. एकंदरीत वनांमुळे तापमानाची शीत व उष्ण या दोन्ही टोकांकडील प्रखरता कमी होते आणि स्थानिक जलवायुमान सम होण्याकडे प्रवृत्ती असते.
वनांमुळे
पावसाचे प्रमाण वाढते की निर्वनीकरण केलेल्या प्रदेशात ते कमी होते याचे नक्की
उत्तर शोधण्यासाठी वातावरण-वैज्ञानिकांनी बरेच प्रयोग केले आहेत. याबाबत
आतापर्यंतचे निष्कर्ष असे आहेत की, चक्रावती पाऊस मुख्यतः
वातावरणीय घटकांवर अवलंबून असतो व तो वनांमुळे अथवा वनांच्या अभावामुळे प्रभावित
होत नाही, तथापि वनाच्छादित प्रदेशात प्रवाही ढगांच्या
मार्गात अडथळा येतो, तेथील वृक्षमाथ्यांच्या असमतोल
पृष्ठभागामुळे ढगांवर गतिकीय परिणाम होतो व ढगांच्या प्रवाहांची उंची वाढून
संद्रवण सुलभ होते म्हणून आसपासच्या वनरहित प्रदेशापेक्षा येथे जास्त पाऊस
पडण्याची शक्यता असते. या फरकाचे प्रमाण अल्प असले, तरी अवर्षण
क्षेत्रात ते महत्त्वाचे ठरू शकते. तापमान व पाऊस यांप्रमाणेच हवेतील आर्द्रतेवरही
वनांचा प्रभाव असतो. वनरहित प्रदेशापेक्षा वनाच्छादित क्षेत्रात हवेची निरपेक्ष
तसेच सापेक्ष आर्द्रता जास्त असते; तसेच वनक्षेत्रातील
जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन तेथील आच्छादनामुळे कमी होते. अशा रीतीने वनरहित
प्रदेशापेक्षा वनप्रदेशात एकूणच हवेतील व जमिनीतील ओलावा जास्त असतो.
वनप्रदेशातील
झाडीमुळे त्या प्रदेशात वाहाणाऱ्या वाऱ्यावरही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होत असतो.
झाडी दाट असेल, तर वाऱ्याचा वेग वनप्रदेशात एकदम १० ते ६०%
कमी होतो. जोरदार वाऱ्यांपासून वनप्रदेशाच्या आड असणाऱ्या शेतीच्या पिकांना अशा
रीतीने उत्तम संरक्षण मिळते. तसेच सततच्या वाऱ्यामुळे मातीचे कण हवेत उडून
धुळीच्या वावटळी उठणे व जमिनीची धूप होणे या क्रिया झाडी असलेल्या वनप्रदेशांमुळे
रोखल्या जातात. विशेषतः उष्ण व कोरड्या हवेच्या प्रदेशात वनांच्या या उपयोगितेला
फार महत्त्व आहे. तुफाने व चक्री वादळे यांपासून वनांमुळे परिणामकारक संरक्षण
मिळते.
पर्यावरणावर
होणाऱ्या वनांच्या उपकारक परिणामांत जलनियमनाला सर्वांत महत्त्वाचे स्थान दिले
पाहिजे. झाडी असलेल्या भूभागावर पडणाऱ्या पावसाचे पाणी हे एकदम जमिनीवर न पडता
झाडांच्या पानांवर, डहाळ्यांवर, फांद्यांवर,
खोडावर मग भूपृष्ठावर अशा क्रमाने खाली उतरत जाते. त्यानंतर हे पाणी
हळूहळू जमिनीत मुरते. मुळे पाणी शोषून घेतात. या सर्वांमुळे पाण्याचा वेग
नियंत्रित होतो. व मृदेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. हे पाणी यथावकाश
जमिनीच्या सच्छिद्र वाटांद्वारे संथ व स्वच्छ झऱ्यांच्या व ओहोळांच्या रूपाने
जमिनीच्या बाहेर पडते व ते प्रदीर्घ काळ टिकण्याची शक्यता असते. याउलट वनाच्छादन
नसलेल्या जमिनीवर पडणाऱ्या वृष्टीचे पाणी विनाविलंब भूपृष्ठीवरून वाहू लागते व
त्या ओघात तेथे असणारी मृदाही पाण्याबरोबर वाहून जाते. म्हणून पाणलोट क्षेत्रात
सुस्थितीतील वने नसली, तर जोराच्या पावसामुळे मृदेचे प्रचंड
प्रमाणात स्थलांतर होते व मूळ ठिकाणाची झपाट्याने धूप होते. भारतात दरवर्षी सु.
५०० कोटी टन मृदा अशा तऱ्हेने वाहून जाते. पावसाळ्यात नदीनाल्यांना गढूळ पाण्याचे
भयानक पूर येण्याचे व त्यापासून होणाऱ्या जीवित व वित्तहानीचे कारण मुख्यतः पाणलोट
क्षेत्रातील वनांचा विध्वंस अथवा संपूर्ण अभाव हेच असते. मृदा मोठ्या प्रमाणात
वाहून गेल्याने जलविद्युत् व सिंचन प्रकल्पांतर्गंत प्रचंड गुंतवणूक करून तयार
केलेल्या जलाशयात अवाजवी गाळ साठून तेथील पाणी साठविण्याची क्षमता झपाट्याने कमी
होते. असे धरणातील पाण्याचा साठा कमी होण्याचे प्रकार जगात अनेक ठिकाणी घडत आहेत.
यावर पाणलोट क्षेत्रात वने राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
निसर्गनिर्मित
अनेक वनस्पती व प्राणी यांचे अस्तित्व केवळ वनांवरच अवलंबून असते आणि अशा वनस्पती, पशुपक्षी, कीटक व जिवाणू यांचे आश्रयस्थान म्हणून
वने अतिशय महत्त्वाची आहेत. वनांचा विध्वंस होऊन त्यांचे नैसर्गिक निवासस्थान
नाहीसे झाल्यामुळे अनेक वन्य पशुपाक्ष्यांच्या जाती भूतलावरून निर्वंश झालेल्या
आहेत. योग्य संरक्षण असणाऱ्या वनांत वनस्पती, प्राणी
इत्यादींना आश्रय व निवारा तर मिळतोच, शिवाय अशा
वनप्रदेशातील रमणीय निसर्गदृश्ये, शांतता व स्वच्छ वातावरण
यांमुळे मानवी समाजाला विशेष मनोरंजन व विश्रांतीचे ठिकाण उपलब्ध होते; तसेच या नैसर्गिक जीवांच्या शास्त्रीय अभ्यासाला व संशोधनालाही येथे वाव
मिळतो. यासाठीच अनेक देशांत निसर्गोद्याने, अभयारण्ये,
वनोद्याने व राष्ट्रीय उद्याने म्हणून निवडक वने राखून ठेवलेली
असतात. [⟶ राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश].
महाराष्ट्रातील निसर्ग संवर्धन आणि वन्य
प्राणीविषयक धोरण
Thu, 12/15/2011 - 16:22 — admin
(लेखक:
श्री. नाशिकराव तिरपुडे, वनमंत्री, महाराष्ट्र
राज्य)
महाराष्ट्र
दि. १३/१०/१९६८
जगातील
अन्य भागात पशुंना जे स्थान आहे त्यापेक्षा अधिक मानाचे स्थान देणा-या धर्माचे व
ध्येयवादाचे जन्मस्थान भारत आहे. ही गोष्ट इतिहासावर नजर टाकली तरी सहज लक्षात
येवू शकेल. वेदापासून सुरू झालेला भारतीय साहित्याचा पहिला ग्रंथ पाहिला तरी त्यात
ठायी ठायी पशूंचे संदर्भ आलेले आपल्याला दिसतील. वेदातील एक तृतीयांश सूत्रांत
पशुसंरक्षणाची महती वर्णन केलेली आहे. हिंदू धर्मात अशी एकही देवता नाही की जिचा
या ना त्या कारणाने एखाद्या प्राण्याशी संबंध जोडला गेलेला नाही. प्राण्यावर दया
करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीर यांचीही उदाहरणे विसरता येण्यासारखी नाहीत.
परंतु धर्माची तत्वे व ध्येये आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो तेव्हा काय दिसते. हया
तत्वाकडे आपण दुर्लक्ष करतो. वन्य जीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. पण आज
मात्र आपला निसर्गाशि संबंध पूर्वी इतका जवळचा राहिलेला नाही. म्हणून आपल्यापैकी
काही लोक वनाचे व वन्य प्राण्याचे संरक्षण का व कशासाठी करावयाचे असा सवाल
विचारतात.
पाटबंधारे
व औद्योगिक प्रकल्प यामुळे व विशेषतः जंगलाच्या अंतर्भागापर्यंत प्रवेश झाल्यामुळे
वनांची व पर्यायाने वन्य प्राण्यांची पिछेहाट झाली. विकासाची योजना आखतांना
निसर्गाशी संबंधित असलेल्या गोष्टीचा करावा तेवढा विचार केला जात नाही. वन्य
प्राण्यांना निसर्गाने विशिष्ट कामगिरी दिलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला वाटते
त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात त्यांचा आपल्याला उपयोग होतो. वन्य प्राणी हे जंगलाचे
एक अविभाज्य घटक आहेत आणि इतर गोष्टींचा विचार बाजूला ठेवला तरी एक गोष्ट मात्र
खरी आहे की त्यांचा -हास झाल्याने निसर्गात जो असमतोल
निर्मांण होईल त्याचे परिणाम फार दूरवर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
पूर्वींच्या
काळी जंगलेच इतकी घनदाट होती की, माणसाला तेथे प्रवेश करणेच अशक्य होते आणि त्यामुळेंच वन्य
प्राण्यांचे आपोआप संरक्षण होत असे. पंरतु विसाव्या शतकाच्या सुरूवातीस वन्य
प्राण्यांची निर्दयपणे कत्तल करण्यास सुरूवात झाली. लोकसंख्येतील वाढ, त्यामुळे बदलेली आर्थिक परिस्थिती, जमिनी संबंधीची
वाढती गरज, निरनिराळया प्रकल्पासाठी झालेली जंगलतोड, वाहतुकीतील सुधारणा, विशेषतः बेगुमानपणे चालणा-या
जीपचे आगमन, डोळे दिपवणा-या सर्च लाईटचा शोध, सामर्थ्य व लांब पल्ल्याच्या बंदुकांचा शोध आणि वन्य प्राण्यापासून
मिळणा-या मालाचा सुरू झालेला व्यापार इत्यादि कारणामुळे वन्य प्राण्यांची संख्या
कमी झाली.
ज्या
जाती स्वतःच्या बचाव करण्यास असमर्थ ठरल्या अशा अनेक जाती पूर्णपणे नामशेष
होण्याच्या मार्गाला लागल्या. 19 व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत जंगलाचा राजा समजला जाणारा
आणि आपल्या राष्ट्रीय बोधचिन्हावर आरूढ झालेला भारतीय सिंह सिंधूच्या पठारावर व
मध्य भारतातील पठारावर मोठया प्रमाणावर अस्तित्वात होता. आज फक्त गुजरातमधील गीर
जंगलाच्या छोटयाशा भागात त्याचे अस्तित्व उरले आहे. शिकारी चित्त्याचीही तीच गत
झालेली आहे. सुंदरवनांतील एकशिंगी गेंडयांचे आता नावही एैकू येत नाही. ठिपक्यांचे
हरिण, काश्मीर हरीण, खेचर, काळवीट वगैरे प्राणीही नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. गोदावरीच्या
पूर्वेकडे रानम्हशी आता दिसतही नाहीत. गुलाबी डोक्याचे बदकही आता सापडत नाहीत.
मोनल ट्रागोपान व मोर मात्र अद्याप आहेत. कारण त्यांची पिसे निर्यांत करण्यावर
निर्बंध घालण्यात आले आहेत, नाही तर हे पक्षीही नष्ट झाले
असते.
आपल्या महाराष्ट्रातसुद्धा काळवीट, रानम्हैस,
लहान हरीण व बारशिंगे हे प्राणीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयात वाघ सर्वत्र आढळत असत. आता क्वचितच दृष्टीस
पडतो. पक्ष्यांच्याही शिकारीचे प्रमाण वाढल्याने किंवा त्यांच्या पैदाशीच्या
जागांवर माणसाने आक्रमण केल्याने त्यांचीही संख्या घटली आहे. एकेकाळी अहमदनगर
जिल्हयातील झुडूपात मोठया संख्येने राहणारा माळढोक हा पक्षी आता क्वचितच दिसतो.
गेल्या
2000 वर्षात
हया जागातून सस्तन प्राण्यांच्या 77 जाती समूळ नष्ट झाल्या
असून त्यातील 39 जाती तर 20 व्या शतकात
नामशेष झाल्या आहते ही विचार करण्यासारखी गोष्ट नाही काय?
कठोर वास्तवता
वन्य
प्राण्यांत मानवाचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे ही माणसाची
व्यक्तिगत व सामुदायिक जबाबदारी आहे याची जाणीव आता जगातील बहुतेक देशातील लोकांना
झाली आहे. म्हणूनच बहुतेक देशानी वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या ना
कोणत्या प्रकारची संघटना स्थापन केली आहे. माणूस व वन्य प्राणी यांचे संबंध ठरवून
देणा-या कायद्याची अंमलबजावणी करणे आणि राष्ट्रीय उद्याने व वन्य प्राण्यांची अन्य
वसतीस्थाने यांची जपणूक करणे ही कामे या संस्थेमार्फत केली जातात. या संघटनाच्या
कार्यांची परिणामकारकता प्रत्येक देशात वेगवेगळी आहे आणि त्या देशातील जनजागृती व
अन्य प्राण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन यावर ही अवलंबून आहे.
कार्यकारणभाव या नैसर्गिक नियमानुसार वन्यजीवन आणि मानवी जीवन याचा फार
निकटचा संबंध आहे. एक कारण आहे तर दुसरा त्याचा परिणाम आहे. निसर्गातील
जीवनसृष्टीत मानव हस्तक्षेप करीत असतो. त्यामुळे जे अनिष्ट परिणाम होतात त्यांना
शेवटी मानवच बळी पडतो.
वन्यजीवन ही एक अमोल नैसर्गिक संपत्ती आहे. या संपत्तीचा जर आपण व्यर्थ
अपव्यय केला तर ती नाहीशी होत जाईल आणि ती पूर्णपणे नष्ट झाली म्हणजे त्या संपत्ती
पासून होणा-या फायद्यांनाही मुकावे लागेल ही गोष्ट विसरता कामा नये. वन्यप्राणी ही
एकच नैसर्गिक संपत्ती अशी आहे की तिचे योग्य जतन करण्याची सर्वात जास्त आवश्यकता
आहे. आजपर्यंत त्याकडे फार दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याची अतोनात हानी झाली
आहे.
सध्याच्या युगात अनेक मूल्यवान गोष्टी नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत
वन्यप्राणी वस्ती करून राहतात अशा वनांचे संरक्षण करून आपण पुढच्या पिढयासाठी
केवढा तरी अमोल ठेवा जतन करून ठेवणार आहोत. हा दूरगामी परिणामही विचारात घेण्यासारखा
आहे.
वन्य जीवनात पुन्हा पुन्हा भर पडत असता, वन्य प्राण्यांचे योग्य जतन केले असता नवीन जीवांची उत्पत्ती होत राहील.
एका प्राण्याचे जीवन संपले तरी त्याच्या जागी दुसरा येऊ शकेल आणि अशा त-हेने
अनन्तकालापर्यंत या संपत्तीचा आपल्याला लाभ होईल.
वन्य प्राण्यांचे जतन करणे म्हणजे त्यांना पूर्ण संरक्षण देणे ही गोष्ट
ओघानेच आली. त्यामुळे या परिस्थितीत त्यांची शिकार होण्याची शक्यता नाही. अर्थात
प्रत्येक प्राण्यांचे जीवनमान ठराविक असते त्याला मर्यादा असते. माणसाने ते संपवले
नाही तरी निसर्गनियमानुसार त्यांना मरण येणारच. परंतु त्यांची योग्य जपणूक केली तर
प्रत्येक जातीचे प्राणी भविष्यकाळात शतकानुशतके उपलब्ध होऊ शकतील.
वन्य प्राणी आणि जीवनाची अन्य साधने यांचे भवितव्य एकमेकांशी निगडीत आहे
जमीन संरक्षणाची फार मोठया प्रमाणावर काळजी घेणारी राष्ट्रे, वन्यप्राणी संरक्षणाकडेही
तितकेच लक्ष देतात त्यामुळे वन्यप्राणी संरक्षण या प्रश्नाचा अलगपणे विचार होऊ शकत
नाही. अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाच्या प्रश्नाचाच तो एक भाग आहे.
आपले राज्य हे कृषी प्रधान आहे व कृषीवरच आपली
अर्थव्यवस्था प्रामुने अवलंबून आहे. अशा परिस्थितीत एकीकडे अन्नधान्याचे उत्पादन
वाढविण्याची खरी गरज असतांना वन्य पशूपक्षी संरक्षणासाठी मोहीम ही विसंगत वाटते
असे सांगण्यात येते. लोकसंख्येची आज भरमसाठ वाढ होत आहे व लागवडीपासून मिळणारे
उत्पादन घटत आहे. अशी परिस्थितीत वरील विधान कदाचित बरोबर वाटण्याचा संभव आहे. आज
जंगल जमिनीवर शेतीचे एक प्रकारे आक्रमण होत आहे. त्यामुळे जंगलाच्या संरक्षणाची
निकड अधिकच तीव्रतेने भासत आहे. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी साधन शेती वाढविली
पाहिजे ,केवळ शेतजमिनीचा विस्तार वाढवून भासणार नाही.
समतोल
आर्थिक विकासासाठी उत्पादन-वाढ, जमिनीचे संरक्षण, जंगलाचे महत्व या
सर्व गोष्टींचा दूर दृष्टीने विचार केला पाहिजे.
वैशिष्टयपूर्ण वन्य जीवताचा वारसा
आपल्या देशातील हवामान भिन्न भिन्न प्रकारचे असून येथील वन्य सृष्टीही
संपन्न व विविध प्रकारची आहे. आणि वैचित्र्यपूर्ण व विपुल प्रमाणात वनसष्ष्टीची
निपज या भूमित होत आहे हे आपले भाग्यच होय. येथील जंगलात पाचशेहून अधिक प्रकारचे
वन्य प्राणी असून, कीटक, सरपटणारे
प्राणी व मासे यांच्या हजारो प्रकारच्या जाती पुष्कळ प्रमाणात आहेत.
अभिमान वाटावा अशा वैचित्र्यपूर्ण वन्य जीवनाने आपले राज्य संपन्न आहे.
वन्य प्राण्यांपैकी वाघ, चित्ता, गवा,
सांबर, चितळ, नीलगाय,
तरस, अस्वल, आणि डुक्कर
ही अगदी माहितीची नावे आहेत. आपल्या राज्यात चांदा येथील जंगल तर उत्कृष्ट
जातीच्या वाघाबद्दल प्रसिद्धच आहे. काळवीट हा दुर्मिळ प्राणी काही भागातच दृष्टीस
पडतो. चांदा जिल्हयातील भामरागडच्या जवळच असलेल्या, मध्यप्रदेशातील
बस्तरच्या जंगलात असलेले रानरेडे आपली राहती जागा सोडून क्वचितच बाहेत पडतात.
आपल्याकडे प्राण्यापेक्षाही त-हे-त-हेचे पक्षी अधिक आहे. बुलबुल, श्यामा, कोकीळा, मैना आणि लांब
पंखांचा लहानसा पोपट हे पक्षी तर मधूर कूंजन व आवाजाच्या नकला करण्यात प्रसिद्धच
आहेत. उल्लेखनीय असे इतर पक्षी म्हणजे कौतवाल, बडबडया,
वॅगटेल्स, सनबर्डंस्, खंडया,
बगळा, लांब चोंचीचा करकोचा आणि डौलदार
पिसा-याचा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हे होते. जंगली कोंबडा, लांब
शेपटीचा कोंबडा, चकोर, लांब कॉटन टील्स
टील्स, व कबुतरे या पक्ष्यांचे प्रमाण बरेच आहे. वैशिष्ट
पूर्णं असा भारतीय सालढोक हा विशेषतः अहमदनगरच्या जंगलात आढळणारा पक्षी
तेथेही केव्हातरी दृष्टीस पडतात. स्थलांतर करणारे बदकासारखे पक्षी हंगामात नेहमीच
दिसतात.
वन्य-जीवन
व्यवस्थापनाचे धोरण
वन्य प्राण्यांचे संरक्षण व नियंत्रण करण्यासाठी एकसूत्रित कायदा व
प्रत्यक्ष उपाययोजना करून तसेच संबंधित भागातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून
शासनाने राष्ट्रीय वन्यप्राणी जीवन व्यवस्थापनासंबंधीचे धोरण आखले आहे. त्याचे
स्वरूप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहे -
1) शेतीला लागूनच असलेल्या
जंगलांच्या सरहद्दीच्या भागातील वन्य प्राण्यांचे अंधपणे संरक्षण करणे हे शेतीस
मारक ठरू नये. म्हणून वन्य प्राण्यांचे संरक्षण करतांना, वनव्याप्ती व शेती यासाठी
आवश्यक असलेल्या गोष्टी प्रथम लक्षात घेतल्या पाहिजेत.
2) वन्य जीवनावरील खर्च वाढवून
राष्ट्रीय दृष्टीकोनातून त्यांनी स्थापन केली पाहिजे.
3) वन्य जीवनातील सौंदर्यपूर्ण, सांस्कृतिक, नैतिक, मनोरंजक व शास्त्रीय गोष्टीचे मूल्य
लक्षात घेऊन त्याबाबत प्रगती केली पाहिजे. या करटयांच्या आधारेच पुढील प्रमाणे निर्णय
घेण्यात आले आहेत.
(अ) वन्य प्राण्यांना बाहय जगापासून जरा सुद्धा
उपसर्ग पोहोचू नये म्हणून राष्ट्रीय उद्यान व आश्रयस्थानाने ही जंगालाच्या आतील
भागात निर्माण करावीत. या भागात वन्य प्राण्यांचे दक्षतापूर्वक संरक्षण करण्यात
येईल. राष्ट्रीय उद्यानातच अत्यंत सुरक्षित म्हणून काही भाग राखून ठेवण्यात येईल.
तेथे प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ शकणार नाही. त्यामुळे वनस्पती व
वन्य प्राणी यांची नैसर्गिक अवस्था जतन केली जाईल.
वन्य
जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे सुलभ होऊन वनस्पती व वन्यप्राणी यांचे मूळ स्वरूप
कायम राखत येईल.
(ब) मनुष्यवस्तीपासून दूर अशा जंगलात शिकारीसाठी
काही भाग राखून ठेवण्यात येईल परंतु तेथे सहसा शिकार करण्यास बंदी राहील. त्यामुळे
वन्य प्राण्याची जास्त झालेली संख्या कमी करण्यास मदत होईल. चांगल्या शिकार
क्षेत्रामुळे देशातील तसेच परदेशातील अनेक शिकरी तिथे आकर्षिले जातात व शासनाला
त्यामुळे चांगलेच उत्पन्न मिळते. म्हणून काही निवडक भागात शिकार क्षेत्र तयार
करण्यात येईल.
(क) तुरळकपणे पसरलेल्या व शेतातील पिके खाऊन
जगणा-या प्राण्यांची मुक्तपणे शिकार करण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे
पिकांचा होणार नाशही थांबु शकेल.
अशा
रितीने वन्य पशुपक्षांच्या संरक्षणासाठी जे विविध उपाय योजण्यात येतील त्यांचे यश
शेवटी जनतेकडून मिळणा-या सहकार्यावरच अवलंबून राहील. त्यामुळे या संबंधी चांगली
प्रसिद्धी करून व जनमत अनुकूल बनवून वन्य प्राणी संरक्षणाच्या मोहिमेला पोषक
वातारवण निर्माण करणे आवश्यक आहे.
राज्यातील आबालवृद्धांच्या मनात वन्य पशूपक्षांबद्दल एक प्रकारची दयेची
भावना निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी आपण वन्य प्राणी सप्ताह साजरा करतो. आपल्या
राज्यात सध्या जिल्हयात ताडोबा येथे असे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. शिवाय
कोल्हापूर जिल्हयात राधानगरी येथे गव्यासाठी लहानसे आश्रयस्थान आहे. राज्यात
सर्वत्र राष्ट्रीय उद्याने व आश्रयस्थाने निर्माण करण्याबाबत विचार चालू आहे.
बोरिवली येथे वन्य पशुपक्षासाठी राष्ट्रीय उद्यान व कुलाबा जिल्हयात कर्नाळा येथे
पक्षासाठी आश्रयस्थान निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. अशा राष्ट्रीय उद्यान व
आश्रयस्थानामुळे जनतेच्या मनात हळुहळु वन्य प्राणी संरक्षणाबद्दल आस्था निर्माण
होईल.
शिकारीचे नियमन करण्यासाठी राज्यात सर्व सुरक्षित जंगलामध्ये
शिकार-क्षेत्रे निर्माण करण्यात येत असून, तेथे शिकार करण्यासाठी परवाने देण्यात
येतील. परवान्यांच्या फीच्या उत्पन्नाखेरीज प्रत्येक शिकारीवर रॉयल्टी घेण्यात
येईल या शिकारक्षेत्रामध्ये करावयाच्या एकूण शिकारीवरील कमाल मर्यादा निश्चित
करण्यात येईल व त्यात अमूक ठराविक काल हा शिकार न करण्याचा म्हणजेच विश्रांतीचा
काल म्हणून निश्चित करण्यात येईल.
वन्य
प्राणी विषयक धोरणाची नीट अमलबजावणी व्हावी यासाठी वेगळा कायदा करणे भाग पडले असून
1951 मध्ये
मुंबई वन्य पशु पक्षी विषयक कायदा करण्यात आला. वन्य प्राण्यांच्या जपणूकीसंबंधी
हा पहिला कायदा होय. काही किरकोळ दुरूस्त्यांसह हा कायदा संबंध राज्याला लागू आहे.
मानवी जीविताला व मालमत्तेला हानिकारक ठरणा-या पशुंना मारण्याची तसेच
स्वसंरक्षणासाठी प्राण्यांना ठार करण्याची परवानगी देण्याची तरतूद या कायद्यात
आहे.
राज्यात शासनाला सल्ला देण्यासाठी वन्यप्राणी विषयक सल्लागार मंडळाची
नेमणूक करण्यात आली आहे. मंडळावर जनतेचे प्रतिनिधी असून वेळोवेळी या मंडळाच्या
बैठकीही भरत असतात. मंडळाच्या शिफारशीनुसार राज्याचे वन्य प्राणी विषयक धोरण
ठरविले जाते व त्यानुसारच कायदे करण्यात येतात.
कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनतेतूनच वन्य प्राणी संरक्षणाबद्दल आस्था
असलेल्या काही जणंना ऑनररी गेम वार्डन म्हणून नेमण्यात येते.
राष्ट्रीय
उद्यानासाठी एक वेगळाच कायदा करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे.
वन्य
प्राणी सरक्षणासाठी कायदे करणे आवश्यक असले तरी आधी सांगितल्याप्रमाणे केवळ
कायद्यांनी हा हेतू साध्य होत नाही. त्यासाठी योग्य प्रचार केला पाहिजे व जनमत
तयार केले पाहिजे. आपल्या वनांचे व वन्य पशुपक्षांचे पुनर्वसन ही प्रत्येकाचीच
जबाबदारी आहे. वन वन्य पशुपक्षी हा आपला पवित्र राष्ट्रीय वारसा आहे. आपल्या
पूर्वजांनी त्यांचे चांगले रक्षण केले. आपणही सर्वांनी मिळून हा वारसा जतन करून
ठेवण्याचे प्रयत्न करू या आणि राष्ट्रीय विकासास हातभार लावू या.
No comments:
Post a Comment