Wednesday, 26 June 2013

महाराष्ट्रातील निसर्ग संवर्धन आणि वन्य प्राणीविषयक धोरण


·         HOME
·         ARTICLES
·         GALLERIES
·         
महाराष्ट्रातील निसर्ग संवर्धन आणि वन्य प्राणीविषयक धोरण
Thu, 12/15/2011 - 16:22 — admin

(लेखक: श्री. नाशिकराव तिरपुडेवनमंत्रीमहाराष्ट्र राज्य)
                                                                             महाराष्ट्र दि. १३/१०/१९६८

          जगातील अन्य भागात पशुंना जे स्थान आहे त्यापेक्षा अधिक मानाचे स्थान देणा-या धर्माचे व ध्येयवादाचे जन्मस्थान भारत आहे. ही गोष्ट इतिहासावर नजर टाकली तरी सहज लक्षात येवू शकेल. वेदापासून सुरू झालेला भारतीय साहित्याचा पहिला ग्रंथ पाहिला तरी त्यात ठायी ठायी पशूंचे संदर्भ आलेले आपल्याला दिसतील. वेदातील एक तृतीयांश सूत्रांत पशुसंरक्षणाची महती वर्णन केलेली आहे. हिंदू धर्मात अशी एकही देवता नाही की जिचा या ना त्या कारणाने एखाद्या प्राण्याशी संबंध जोडला गेलेला नाही. प्राण्यावर दया करण्याचा मंत्र देणारे बुद्ध व महावीर यांचीही उदाहरणे विसरता येण्यासारखी नाहीत. परंतु धर्माची तत्वे व ध्येये आपण प्रत्यक्ष आचरणात आणतो तेव्हा काय दिसते. हया तत्वाकडे आपण दुर्लक्ष करतो. वन्य जीवन हे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. पण आज मात्र आपला निसर्गाशि संबंध पूर्वी इतका जवळचा राहिलेला नाही. म्हणून आपल्यापैकी काही लोक वनाचे व वन्य प्राण्याचे संरक्षण का व कशासाठी करावयाचे असा सवाल विचारतात.
         पाटबंधारे व औद्योगिक प्रकल्प यामुळे व विशेषतः जंगलाच्या अंतर्भागापर्यंत प्रवेश झाल्यामुळे वनांची व पर्यायाने वन्य प्राण्यांची पिछेहाट झाली. विकासाची योजना आखतांना निसर्गाशी संबंधित असलेल्या गोष्टीचा करावा तेवढा विचार केला जात नाही. वन्य प्राण्यांना निसर्गाने विशिष्ट कामगिरी दिलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला वाटते त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात त्यांचा आपल्याला उपयोग होतो. वन्य प्राणी हे जंगलाचे एक अविभाज्य घटक आहेत आणि इतर गोष्टींचा विचार बाजूला ठेवला तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की त्यांचा -हास झाल्याने निसर्गात जो असमतोल निर्मांण होईल त्याचे परिणाम फार दूरवर झाल्याशिवाय राहणार नाहीत.
         पूर्वींच्या काळी जंगलेच इतकी घनदाट होती कीमाणसाला तेथे प्रवेश करणेच अशक्य होते आणि त्यामुळेंच वन्य प्राण्यांचे आपोआप संरक्षण होत असे. पंरतु विसाव्या शतकाच्या सुरूवातीस वन्य प्राण्यांची निर्दयपणे कत्तल करण्यास सुरूवात झाली. लोकसंख्येतील वाढत्यामुळे बदलेली आर्थिक परिस्थितीजमिनी संबंधीची वाढती गरजनिरनिराळया प्रकल्पासाठी झालेली जंगलतोडवाहतुकीतील सुधारणाविशेषतः बेगुमानपणे चालणा-या जीपचे आगमनडोळे दिपवणा-या सर्च लाईटचा शोधसामर्थ्य व लांब पल्ल्याच्या बंदुकांचा शोध आणि वन्य प्राण्यापासून मिळणा-या मालाचा सुरू झालेला व्यापार इत्यादि कारणामुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी झाली.
         ज्या जाती स्वतःच्या बचाव करण्यास असमर्थ ठरल्या अशा अनेक जाती पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गाला लागल्या. 19 व्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत जंगलाचा राजा समजला जाणारा आणि आपल्या राष्ट्रीय बोधचिन्हावर आरूढ झालेला भारतीय सिंह सिंधूच्या पठारावर व मध्य भारतातील पठारावर मोठया प्रमाणावर अस्तित्वात होता. आज फक्त गुजरातमधील गीर जंगलाच्या छोटयाशा भागात त्याचे अस्तित्व उरले आहे. शिकारी चित्त्याचीही तीच गत झालेली आहे. सुंदरवनांतील एकशिंगी गेंडयांचे आता नावही एैकू येत नाही. ठिपक्यांचे हरिणकाश्मीर हरीणखेचरकाळवीट वगैरे प्राणीही नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. गोदावरीच्या पूर्वेकडे रानम्हशी आता दिसतही नाहीत. गुलाबी डोक्याचे बदकही आता सापडत नाहीत. मोनल ट्रागोपान व मोर मात्र अद्याप आहेत. कारण त्यांची पिसे निर्यांत करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेतनाही तर हे पक्षीही नष्ट झाले असते.
        आपल्या महाराष्ट्रातसुद्धा काळवीटरानम्हैसलहान हरीण व बारशिंगे हे प्राणीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडयात वाघ सर्वत्र आढळत असत. आता क्वचितच दृष्टीस पडतो. पक्ष्यांच्याही शिकारीचे प्रमाण वाढल्याने किंवा त्यांच्या पैदाशीच्या जागांवर माणसाने आक्रमण केल्याने त्यांचीही संख्या घटली आहे. एकेकाळी अहमदनगर जिल्हयातील झुडूपात मोठया संख्येने राहणारा माळढोक हा पक्षी आता क्वचितच दिसतो.
       गेल्या 2000 वर्षात हया जागातून सस्तन प्राण्यांच्या 77 जाती समूळ नष्ट झाल्या असून त्यातील 39 जाती तर 20 व्या शतकात नामशेष झाल्या आहते ही विचार करण्यासारखी गोष्ट नाही काय?
कठोर वास्तवता
       वन्य प्राण्यांत मानवाचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे ही माणसाची व्यक्तिगत व सामुदायिक जबाबदारी आहे याची जाणीव आता जगातील बहुतेक देशातील लोकांना झाली आहे. म्हणूनच बहुतेक देशानी वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची संघटना स्थापन केली आहे. माणूस व वन्य प्राणी यांचे संबंध ठरवून देणा-या कायद्याची अंमलबजावणी करणे आणि राष्ट्रीय उद्याने व वन्य प्राण्यांची अन्य वसतीस्थाने यांची जपणूक करणे ही कामे या संस्थेमार्फत केली जातात. या संघटनाच्या कार्यांची परिणामकारकता प्रत्येक देशात वेगवेगळी आहे आणि त्या देशातील जनजागृती व अन्य प्राण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन यावर ही अवलंबून आहे.
        कार्यकारणभाव या नैसर्गिक नियमानुसार वन्यजीवन आणि मानवी जीवन याचा फार निकटचा संबंध आहे. एक कारण आहे तर दुसरा त्याचा परिणाम आहे. निसर्गातील जीवनसृष्टीत मानव हस्तक्षेप करीत असतो. त्यामुळे जे अनिष्ट परिणाम होतात त्यांना शेवटी मानवच बळी पडतो.
        वन्यजीवन ही एक अमोल नैसर्गिक संपत्ती आहे. या संपत्तीचा जर आपण व्यर्थ अपव्यय केला तर ती नाहीशी होत जाईल आणि ती पूर्णपणे नष्ट झाली म्हणजे त्या संपत्ती पासून होणा-या फायद्यांनाही मुकावे लागेल ही गोष्ट विसरता कामा नये. वन्यप्राणी ही एकच नैसर्गिक संपत्ती अशी आहे की तिचे योग्य जतन करण्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. आजपर्यंत त्याकडे फार दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याची अतोनात हानी झाली आहे.
        सध्याच्या युगात अनेक मूल्यवान गोष्टी नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत वन्यप्राणी वस्ती करून राहतात अशा वनांचे संरक्षण करून आपण पुढच्या पिढयासाठी केवढा तरी अमोल ठेवा जतन करून ठेवणार आहोत. हा दूरगामी परिणामही विचारात घेण्यासारखा आहे. 
        वन्य जीवनात पुन्हा पुन्हा भर पडत असता  वन्य प्राण्यांचे योग्य जतन केले असता नवीन जीवांची उत्पत्ती होत राहील. एका प्राण्याचे जीवन संपले तरी त्याच्या जागी दुसरा येऊ शकेल आणि अशा त-हेने अनन्तकालापर्यंत या संपत्तीचा आपल्याला लाभ होईल.
        वन्य प्राण्यांचे जतन करणे म्हणजे त्यांना पूर्ण संरक्षण देणे ही गोष्ट ओघानेच आली. त्यामुळे या परिस्थितीत त्यांची शिकार होण्याची शक्यता नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यांचे जीवनमान ठराविक असते त्याला मर्यादा असते. माणसाने ते संपवले नाही तरी निसर्गनियमानुसार त्यांना मरण येणारच. परंतु त्यांची योग्य जपणूक केली तर प्रत्येक जातीचे प्राणी भविष्यकाळात शतकानुशतके उपलब्ध होऊ शकतील.
        वन्य प्राणी आणि जीवनाची अन्य साधने यांचे भवितव्य एकमेकांशी निगडीत आहे जमीन संरक्षणाची फार मोठया प्रमाणावर काळजी घेणारी राष्ट्रेवन्यप्राणी संरक्षणाकडेही तितकेच लक्ष देतात त्यामुळे वन्यप्राणी संरक्षण या प्रश्नाचा अलगपणे विचार होऊ शकत नाही. अन्य नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणाच्या प्रश्नाचाच तो एक भाग आहे.
      आपले राज्य हे कृषी प्रधान आहे व कृषीवरच आपली अर्थव्यवस्था प्रामुने अवलंबून आहे. अशा परिस्थितीत एकीकडे अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याची खरी गरज असतांना वन्य पशूपक्षी संरक्षणासाठी मोहीम ही विसंगत वाटते असे सांगण्यात येते. लोकसंख्येची आज भरमसाठ वाढ होत आहे व लागवडीपासून मिळणारे उत्पादन घटत आहे. अशी परिस्थितीत वरील विधान कदाचित बरोबर वाटण्याचा संभव आहे. आज जंगल जमिनीवर शेतीचे एक प्रकारे आक्रमण होत आहे. त्यामुळे जंगलाच्या संरक्षणाची निकड अधिकच तीव्रतेने भासत आहे. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी साधन शेती वाढविली पाहिजे ,केवळ शेतजमिनीचा विस्तार वाढवून भासणार नाही.
     समतोल आर्थिक विकासासाठी उत्पादन-वाढजमिनीचे संरक्षणजंगलाचे महत्व या सर्व गोष्टींचा दूर दृष्टीने विचार केला पाहिजे.
वैशिष्टयपूर्ण वन्य जीवताचा वारसा
      आपल्या देशातील हवामान भिन्न भिन्न प्रकारचे असून येथील वन्य सृष्टीही संपन्न व विविध प्रकारची आहे. आणि वैचित्र्यपूर्ण व विपुल प्रमाणात वनसष्ष्टीची निपज या भूमित होत आहे हे आपले भाग्यच होय. येथील जंगलात पाचशेहून अधिक प्रकारचे वन्य प्राणी असूनकीटकसरपटणारे प्राणी व मासे यांच्या हजारो प्रकारच्या जाती पुष्कळ प्रमाणात आहेत.
      अभिमान वाटावा अशा वैचित्र्यपूर्ण वन्य जीवनाने आपले राज्य संपन्न आहे. वन्य प्राण्यांपैकी वाघचित्तागवासांबरचितळनीलगायतरसअस्वलआणि डुक्कर ही अगदी माहितीची नावे आहेत. आपल्या राज्यात चांदा येथील जंगल तर उत्कृष्ट जातीच्या वाघाबद्दल प्रसिद्धच आहे. काळवीट हा दुर्मिळ प्राणी काही भागातच दृष्टीस पडतो. चांदा जिल्हयातील भामरागडच्या जवळच असलेल्यामध्यप्रदेशातील बस्तरच्या जंगलात असलेले रानरेडे आपली राहती जागा सोडून क्वचितच बाहेत पडतात.
      आपल्याकडे प्राण्यापेक्षाही त-हे-त-हेचे पक्षी अधिक आहे. बुलबुलश्यामाकोकीळामैना आणि लांब पंखांचा लहानसा पोपट हे पक्षी तर मधूर कूंजन व आवाजाच्या नकला करण्यात प्रसिद्धच आहेत. उल्लेखनीय असे इतर पक्षी म्हणजे कौतवालबडबडयावॅगटेल्ससनबर्डंस्खंडयाबगळालांब चोंचीचा करकोचा आणि डौलदार पिसा-याचा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हे होते. जंगली कोंबडालांब शेपटीचा कोंबडाचकोरलांब कॉटन टील्स टील्सव कबुतरे या पक्ष्यांचे प्रमाण बरेच आहे. वैशिष्ट पूर्णं असा भारतीय सालढोक हा विशेषतः अहमदनगरच्या जंगलात आढळणारा पक्षी तेथेही केव्हातरी दृष्टीस पडतात. स्थलांतर करणारे बदकासारखे पक्षी हंगामात नेहमीच दिसतात.

 वन्य-जीवन व्यवस्थापनाचे धोरण
      वन्य प्राण्यांचे संरक्षण व नियंत्रण करण्यासाठी एकसूत्रित कायदा व प्रत्यक्ष उपाययोजना करून तसेच संबंधित भागातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शासनाने राष्ट्रीय वन्यप्राणी जीवन व्यवस्थापनासंबंधीचे धोरण आखले आहे. त्याचे स्वरूप मुख्यतः पुढीलप्रमाणे आहे -
1)  शेतीला लागूनच असलेल्या जंगलांच्या सरहद्दीच्या भागातील वन्य प्राण्यांचे अंधपणे संरक्षण करणे हे शेतीस मारक ठरू नये. म्हणून वन्य प्राण्यांचे संरक्षण करतांनावनव्याप्ती व शेती यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी प्रथम लक्षात घेतल्या पाहिजेत.
2)  वन्य जीवनावरील खर्च वाढवून राष्ट्रीय दृष्टीकोनातून त्यांनी स्थापन केली पाहिजे.
3)  वन्य जीवनातील सौंदर्यपूर्णसांस्कृतिकनैतिकमनोरंजक व शास्त्रीय गोष्टीचे मूल्य लक्षात घेऊन त्याबाबत प्रगती केली पाहिजे. या करटयांच्या आधारेच पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.
(अ)  वन्य प्राण्यांना बाहय जगापासून जरा सुद्धा उपसर्ग पोहोचू नये म्हणून राष्ट्रीय उद्यान व आश्रयस्थानाने ही जंगालाच्या आतील भागात निर्माण करावीत. या भागात वन्य प्राण्यांचे दक्षतापूर्वक संरक्षण करण्यात येईल. राष्ट्रीय उद्यानातच अत्यंत सुरक्षित म्हणून काही भाग राखून ठेवण्यात येईल. तेथे प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ शकणार नाही. त्यामुळे वनस्पती व वन्य प्राणी यांची नैसर्गिक अवस्था जतन केली जाईल.
  वन्य जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे सुलभ होऊन वनस्पती व वन्यप्राणी यांचे मूळ स्वरूप कायम राखत येईल.
(ब)  मनुष्यवस्तीपासून दूर अशा जंगलात शिकारीसाठी काही भाग राखून ठेवण्यात येईल परंतु तेथे सहसा शिकार करण्यास बंदी राहील. त्यामुळे वन्य प्राण्याची जास्त झालेली संख्या कमी करण्यास मदत होईल. चांगल्या शिकार क्षेत्रामुळे देशातील तसेच परदेशातील अनेक शिकरी तिथे आकर्षिले जातात व शासनाला त्यामुळे चांगलेच उत्पन्न मिळते. म्हणून काही निवडक भागात शिकार क्षेत्र तयार करण्यात येईल.
(क)  तुरळकपणे पसरलेल्या व शेतातील पिके खाऊन जगणा-या प्राण्यांची मुक्तपणे शिकार करण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे पिकांचा होणार नाशही थांबु शकेल.
       अशा रितीने वन्य पशुपक्षांच्या संरक्षणासाठी जे विविध उपाय योजण्यात येतील त्यांचे यश शेवटी जनतेकडून मिळणा-या सहकार्यावरच अवलंबून राहील. त्यामुळे या संबंधी चांगली प्रसिद्धी करून व जनमत अनुकूल बनवून वन्य प्राणी संरक्षणाच्या मोहिमेला पोषक वातारवण निर्माण करणे आवश्यक आहे.
      राज्यातील आबालवृद्धांच्या मनात वन्य पशूपक्षांबद्दल एक प्रकारची दयेची भावना निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी आपण वन्य प्राणी सप्ताह साजरा करतो. आपल्या राज्यात सध्या जिल्हयात ताडोबा येथे असे एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. शिवाय कोल्हापूर जिल्हयात राधानगरी येथे गव्यासाठी लहानसे आश्रयस्थान आहे. राज्यात सर्वत्र राष्ट्रीय उद्याने व आश्रयस्थाने निर्माण करण्याबाबत विचार चालू आहे. बोरिवली येथे वन्य पशुपक्षासाठी राष्ट्रीय उद्यान व कुलाबा जिल्हयात कर्नाळा येथे पक्षासाठी आश्रयस्थान निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. अशा राष्ट्रीय उद्यान व आश्रयस्थानामुळे जनतेच्या मनात हळुहळु वन्य प्राणी संरक्षणाबद्दल आस्था निर्माण होईल.
      शिकारीचे नियमन करण्यासाठी राज्यात सर्व सुरक्षित जंगलामध्ये शिकार-क्षेत्रे निर्माण करण्यात येत असूनतेथे शिकार करण्यासाठी परवाने देण्यात येतील. परवान्यांच्या फीच्या उत्पन्नाखेरीज प्रत्येक शिकारीवर रॉयल्टी घेण्यात येईल या शिकारक्षेत्रामध्ये करावयाच्या एकूण शिकारीवरील कमाल मर्यादा निश्चित करण्यात येईल व त्यात अमूक ठराविक काल हा शिकार न करण्याचा म्हणजेच विश्रांतीचा काल म्हणून निश्चित करण्यात येईल.
       वन्य प्राणी विषयक धोरणाची नीट अमलबजावणी व्हावी यासाठी वेगळा कायदा करणे भाग पडले असून 1951 मध्ये मुंबई वन्य पशु पक्षी विषयक कायदा करण्यात आला. वन्य प्राण्यांच्या जपणूकीसंबंधी हा पहिला कायदा होय. काही किरकोळ दुरूस्त्यांसह हा कायदा संबंध राज्याला लागू आहे. मानवी जीविताला व मालमत्तेला हानिकारक ठरणा-या पशुंना मारण्याची तसेच स्वसंरक्षणासाठी प्राण्यांना ठार करण्याची परवानगी देण्याची तरतूद या कायद्यात आहे.
      राज्यात शासनाला सल्ला देण्यासाठी वन्यप्राणी विषयक सल्लागार मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. मंडळावर जनतेचे प्रतिनिधी असून वेळोवेळी या मंडळाच्या बैठकीही भरत असतात. मंडळाच्या शिफारशीनुसार राज्याचे वन्य प्राणी विषयक धोरण ठरविले जाते व त्यानुसारच कायदे करण्यात येतात.
      कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनतेतूनच वन्य प्राणी संरक्षणाबद्दल आस्था असलेल्या काही जणंना ऑनररी गेम वार्डन म्हणून नेमण्यात येते.
       राष्ट्रीय उद्यानासाठी एक वेगळाच कायदा करण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. वन्य प्राणी सरक्षणासाठी कायदे करणे आवश्यक असले तरी आधी सांगितल्याप्रमाणे केवळ कायद्यांनी हा हेतू साध्य होत नाही. त्यासाठी योग्य प्रचार केला पाहिजे व जनमत तयार केले पाहिजे. आपल्या वनांचे व वन्य पशुपक्षांचे पुनर्वसन ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. वन वन्य पशुपक्षी हा आपला पवित्र राष्ट्रीय वारसा आहे. आपल्या पूर्वजांनी त्यांचे चांगले रक्षण केले. आपणही सर्वांनी मिळून हा वारसा जतन करून ठेवण्याचे प्रयत्न करू या आणि राष्ट्रीय विकासास हातभार लावू या.


No comments:

Post a Comment