Wednesday, 26 June 2013

वन्यप्राणी आणि माणूस यांच्याधील संघर्ष - वर्तमानपत्रांमधील काही उल्लेखनीय लेख

(आमचा पत्ता - संपादक, दैनिक नवप्रभा, नवहिंद भवन, पणजी गोवा 403001. दूरध्वनी क्र. 0832 - 6651113. संपादक - श्री. परेश प्रभू  संपर्क | Copyright 2011. Navhind Papers & Publications)
वन्य प्राणी म्हणती आम्ही मित्र मानवाचे!
Published on: December 12, 2011 - 11:03
·         लेख  - 1
वन्यप्राणी आणि माणूस यांच्याधील संघर्ष कशामुळे !
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTx-YCYR2RwZiz0hpwABD9G4jmjwEhcYwyXYbj_xlnp8jbV4dwZ

वन्य प्राणी आणि मानव संघर्षाची ही समस्या पूर्वी नव्हती. परंतु दिवसेंदिवस ही समस्या अधिक गंभीर का बनत आहे, यावर प्रभावी विचार वेळीच होणे अत्यंत गरजेचे आहे.
शेती व उद्योगधंदाच्या विस्तारासाठी तसेच नद्यांच्या प्रकल्पासाठी जमीनीची मागणी सारखी वाढत राहिल्यामुळे वनांचा सतत नाश होत आहे. आज गावागावात दिसत असलेली ही वनराई पूर्वजांनी सातत्याने केलेल्या वृक्षसंवर्धनाची जाणीव करुन देतात. परंतु आज वनांचा-हास होतो आहे आणि वृक्षसंवर्धनाची जागा अतिक्रमणे, अनिर्बंध तोडणे, वणवे आणि अनियंत्रित चराई यांनी घेतली आहे. अद्यापही आपल्या देशांत इंधन म्हणून जळाऊ लाकडांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. जळावू लाकूडासाठी प्रामुख्याने जंगलांवरच अवलंबून रहावे लागते व बेसुमार जंगलतोड झाली, डोंगरांचे खाणींसाठी उत्खनन झाले.

वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. बिबटे वाघ, गवे रेडे, रानडुक्कर, मोर, माकडे, हत्ती आदी वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घालण्याचे प्रकार प्रामुख्याने पेडणे, डिचोली, सत्तरी, सांगे या तालुक्यांतील अनेक गावांत घडले आहेत. वन्य प्राण्यांनी मानवावर हल्ले करण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत घबराटीचे वातावरण निर्माण होण्यापेक्षाही शेती-बागायती पिकांची जी मोठी हानी झाली त्याची भरपाई कोण करणार?
जंगले उद्ध्वस्त करणे, खाणीसाठी डोंगराचे उत्खनन करणे, वाढत्याबांधकामांमुळे वनराईवर आक्रमण करणे आदी गोष्टींमुळे वनसंपत्ती नष्ट झाली. नैसर्गिक संपत्ती संपत चालली. जलस्त्रोत कमी झाले. पर्यावरण बिघडले. प्रदूषण वाढले आणि म्हणूनच वन्यप्राण्यांची घुस्मटमार झाली अन् होत आहे. अशा परिस्थितीत तहान, भक्ष्य, निवारा यांच्या शोधार्थ त्यांनी जायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
गी व वणवे : जेथे वरचेवर आगी लागतात अशा वनक्षेत्रात काही विशिष्ट जातीची झाडे असणारी वनेच आढळतात. वणवे लागल्यामुळे झाडांची वाढ खुंटते व लाकडात दोष निर्माण होतात. 
मानवाने स्वाताच्या स्वार्थासाठी वन्य प्राण्यांची वस्ती उधवस्त केली  त्यामुळे मानवी वस्तीवर वन्य प्राण्यांचे हल्ले एवढे वाढले आहे की, आता ती एक गंभीर समस्या बनलेली आहे. 
मानवी जीवन आणखी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या मानव निर्मित आहे. राना-वनात वास्तव्य करणा-या वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आल्याने त्यांनी मानवी वस्तीत निवारा शोधण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTx-YCYR2RwZiz0hpwABD9G4jmjwEhcYwyXYbj_xlnp8jbV4dwZ

·         लेख  - 2
वन्य प्राणी आणि मानव जीवनातील संघर्षाची समस्या
राज्यात बिबट्या वाघांचा वावर वाढला आहे. डिचोली तालुक्यात १०-१५ बिबटे विविध गावांत वावरत होते. त्यांनी गेल्या वर्षभरात मानवी वस्तीत घुसून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याच्या व त्यांचा फडशा पाडण्याच्या किमान २५-३० तरी घटना घडल्या. असे प्रकार पेडणे तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात झालेले आहेत. वन खात्याचे अधिकारी व प्राणीमित्र अमृतसिंग यांनी डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी सापळे लावून ८ बिबटे पकडले. नंतर त्यांना त्यांच्या वस्तीत नेऊन सोडून देण्यात आले. दोनशे-तीनशे किलोमीटर क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो. त्यामुळे गोव्याच्या सीमेपलीकडे रानात त्यांना सोडले तरी ते पुन्हा येऊ शकतात. बिबट्या वाघाने माणसावर हल्ला करण्याचे प्रकार त्या मानाने कमी घडले आहेत. तथापि, गाईची वासरे, कुत्रे, मांजरे यांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे.
कर्नाटकातून आलेल्या तीन हत्तींनी पेडणे तालुक्यातील इब्रामपूर, हणखणे, डिचोली तालुक्यातील साळ, वडावल, पिर्ण, मेणकुरे, धुमासे, अडवलपाल या गावात घुसून शेती-बागायतीची प्रचंड प्रमाणात नुकसानी केली. आजतागायत त्या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारकडून कवडीचीही भरपाई मिळालेली नाही. गेल्या वर्षभरात मात्र हत्तीपासूनची भीती कमी झालेली आहे. साखळी, डिचोली, पेडणे या भागात गवे रेडे घुसण्याच्या घटना घडल्या. रानडुकरांनी बागायतीवर अतिक्रमण करून पिकांची नासाडी केली. पेडणे भागात माकडे बिनदिक्कतपणे मानवी वस्तीत वावरतात. तेथील केळी व इतर पिकांचे ही माकडे फारच नुकसान करतात. हाच प्रकार आता डिचोली तालुक्यातही पहायला मिळतो.
पूर्वी कोल्हे दिसायचे. कोल्हे पळाले आणि मोर आले. मयुरनृत्य पहायला बरे वाटते. पण नेत्रसुख देणारे त्यांचे मयुरनृत्य आता महागडे ठरले आहे. कारण मोरांनी भाजी पिकांवर ताव मारण्यासाठी जंगलातून मानवी वस्तीकडे प्रस्थान ठेवले आहे. या सर्व बाबींचा विचार करता, वन्य प्राण्यांमुळे मानवी जीवनाला धोका नि नुकसान संभवते. पण त्याच्यावर कारवाई कोण करणार? वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये त्यांना संरक्षण आहे. फक्त कायद्याने आहे, तेवढेच! कायदा हातात घेऊन त्यांची होणारी हत्या कोण थांबवणार? वाघांना मारले तरी तो वाघोबा नव्हता, ती डरकाळी नव्हे, कोल्हेकुई होती असे वातावरणनिर्मिती करणारेच वाघ बनले आहेत. वन संपत्ती नष्ट करणे, तिचा वाढता -हास न थांबविणे ही प्रवृत्ती अत्यंत घातक ठरली आहे. वन्य प्राण्यांना त्यांचे जीवन आपण आरामात जगू दिले नाही तर, मानवी जीवनात रामच राहणार नाही.
  
·         लेख  - 3
वन्य प्राणी म्हणती आम्ही मित्र मानवाचे!
विचारमंथन व उपाययोजना
सध्या वन्य प्राणी आपल्या जीवन अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. हा संघर्ष सध्या सीमित आहे, तो आणखी वाढला तर, त्याचा धोका मानवांनाच अधिक आहे ही गोष्ट ध्यानात घेऊन उपाययोजना व्हायला हवी. त्याकरीता समस्या निर्मितीमागची कारणे शोधून त्यावरती उपाय करण्याची आवश्यकता आहे.
पकडलेल्या वन्य प्राण्यांना वनखाते दुस-या वन्यप्राणीवस्तीत सोडून देते. पण हा त्यावरती उपाय नव्हे. वन संपत्तीचे जतन करणे, नवी वनराई निर्माण करणे, डोंगर माथ्यावर ( शिल्लक राहिलेल्या) जंगली झाडांची लागवड करणे या गोष्टी युद्धपातळीवर व्हायला हव्यात. भविष्यात काही गोष्टी उलटल्यानंतर का होईना, वन्य प्राण्यांना निवार्‍यासाठी वने उपलब्ध होतील.
बेसुमार भूउत्खनन, बेकायदेशीर व्यवसाय थांबायलाच हवेत. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन व्हायलाच हवे. रानडुक्करांची शिकार करण्याची चटक लागलेले लोक फासे लावतात. त्या फाश्यात रानडुक्कराऐवजी बिबटे अडकून पडल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत. ही बेकायदेशीर हत्या थांबवणे गरजेचे आहे.
बेकायदेशीर वन्य प्राण्यांची हत्या करणारे आपल्या कृत्याचे समर्थन करतात. ते म्हणतात, पूर्वी शिकारीसाठी भोंवड्या काढल्या जायच्या, त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीपासून दूर पळायचे. आता भोंवड्या बंद झाल्या म्हणून वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसतात. काय हा युक्तीवाद!
वन्यप्राणी व मानव यामधील वाढता संघर्ष दोन्ही घटकांना हानीकारक आहे. दोन्ही घटकांचे जीवन धोक्यात आणणारा आहे. म्हणून वरकरणी क्षुल्लक वाटणा-या या विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचारमंथन व्हायला हवे. हे विचारमंथन वन्य प्राणी करू शकत नाहीत. ते सामाजिक प्राणी म्हणून संबोधल्या जाणा-या मनुष्यानेच करायला हवे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... भावनेने वृक्षांकडे पाहिले जायचे. आज ती दृष्टी लयास जात आहे. वृक्षतोड करून किती पैसा जमवता येईल हा व्यवहारी दृष्टीकोन ठेऊन आपण कृती करतो. वन्य प्राण्यांना ते प्राणी आहेत, त्यांचेही कुटुंब जीवन आहे, ही दृष्टी ठेऊन त्यांना संरक्षण देण्याऐवजी आपण त्यांची हत्या करून विक्री करतो, केवळ धन-द्रव्याच्या हव्यासापायी...! हे सारे कितपत योग्य, जीवनपोषक आहे? हे तर जीवन शोषक आहे. प्रत्येक जीव, प्राणीमात्र स्वतःवरती प्रेम करतो. वन्य प्राणीही त्याला अपवाद नाहीत. हे आपल्या लक्षात यायला आपण आपली मानसिकता बदलायला हवी. तसे झाले तर, वन्यप्राणी-मानवी संघर्ष समस्येतून वन्यप्राण्यांची आणि मानवाची सुटका होईल.


·         लेख  - 4
प्राणी सृष्टी : वन्य प्राणी, पाळीवपशू व मानव : 
वनांची उपज व वाढ, सुस्थिती, रचना व प्रकार या सर्वांवर तेथे वावरणारे वन्य प्राणी व पाळीव पशू यांचाही प्रभाव पडतो. वनांवर प्रभाव पाडणाऱ्या घटकांत मानवी संपर्काला फार महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल. अयोग्य रीतीने मानवाने वनांचा वापर केला, तर वनांचा विध्वंस होतो.

रील सर्व घटकांच्या प्रभावावर वनांची रचना, प्रकार व सुस्थिती अवलंबून असते. या सर्व घटक-समुच्चयाला वनविद्येत स्थानीय घटकया ढोबळ नावाने संबोधिले जाते. जीवसृष्टीत प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींतही वाढीसाठी आपसात संघर्ष चालू असतात व विशिष्ट स्थानीय घटकांच्या प्रभावाखाली जगण्यासाठी व वाढीसाठी या वृक्ष-वनस्पतींत विशिष्ट प्रकारचे गुणधर्म निरनिराळ्या समायोजनांच्या रूपाने आढळतात. अशा रीतीने स्थानीय घटक व समायोजने यांच्या रूपाने आढळतात. अशा रीतीने स्थानीय घटक व समायोजने यांच्या संयुक्त प्रभावांनुसार विविध क्षेत्रांत निरनिराळे वन-प्रकार आढळतात.

नांचे कार्य व उपयुक्तता : वने ही केवळ मानवी जीवनात समृद्धीची व संपत्तिनिर्मितीची साधनेच नव्हते. वनांचे याहून महत्त्वाचे कार्य म्हणजे वने निसर्गाचा समतोल राखून मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देतात. जेथे वनांचा प्रचंड प्रमाणावर विध्वंस झाला, त्या प्रदेशात वाळवंटे व दुष्काळ निर्माण होऊन तेथील संस्कृतीच नष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात.

नांमुळे स्थानिक जलवायुमानावर निश्चित परिणाम होतो. उन्हाळ्यात वनाच्छादित प्रदेश सापेक्षतेने थंड व शीतकाळात सापेक्षतेने उबदार असतात. वनातील झाडांची दाटी, तेथील झाडांच्या पानांची रचना यांनुसार कमीअधिक प्रमाणात हा फरक घडतो. वनप्रदेशातील जमिनीचे दिवसा सूर्याच्या उष्णतेपासून रक्षण होते. रात्रीच्या वेळी झाडांच्या आच्छादनामुळे ही जमीन उघड्या माळावरील जमिनीप्रमाणे लवकर थंड होत नाही. त्यामुळे वनप्रदेशात हवेचे व जमिनीचे महत्तम तापमान उघड्या भूभागापेक्षा कमी व किमान तापमान उघड्या जमिनीपेक्षा जास्त असते, असे प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. एकंदरीत वनांमुळे तापमानाची शीत व उष्ण या दोन्ही टोकांकडील प्रखरता कमी होते आणि स्थानिक जलवायुमान सम होण्याकडे प्रवृत्ती असते.

नांमुळे पावसाचे प्रमाण वाढते की निर्वनीकरण केलेल्या प्रदेशात ते कमी होते याचे नक्की उत्तर शोधण्यासाठी वातावरण-वैज्ञानिकांनी बरेच प्रयोग केले आहेत. याबाबत आतापर्यंतचे निष्कर्ष असे आहेत की, चक्रावती पाऊस मुख्यतः वातावरणीय घटकांवर अवलंबून असतो व तो वनांमुळे अथवा वनांच्या अभावामुळे प्रभावित होत नाही, तथापि वनाच्छादित प्रदेशात प्रवाही ढगांच्या मार्गात अडथळा येतो, तेथील वृक्षमाथ्यांच्या असमतोल पृष्ठभागामुळे ढगांवर गतिकीय परिणाम होतो व ढगांच्या प्रवाहांची उंची वाढून संद्रवण सुलभ होते म्हणून आसपासच्या वनरहित प्रदेशापेक्षा येथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. या फरकाचे प्रमाण अल्प असले, तरी अवर्षण क्षेत्रात ते महत्त्वाचे ठरू शकते. तापमान व पाऊस यांप्रमाणेच हवेतील आर्द्रतेवरही वनांचा प्रभाव असतो. वनरहित प्रदेशापेक्षा वनाच्छादित क्षेत्रात हवेची निरपेक्ष तसेच सापेक्ष आर्द्रता जास्त असते; तसेच वनक्षेत्रातील जमिनीवरील पाण्याचे बाष्पीभवन तेथील आच्छादनामुळे कमी होते. अशा रीतीने वनरहित प्रदेशापेक्षा वनप्रदेशात एकूणच हवेतील व जमिनीतील ओलावा जास्त असतो.

नप्रदेशातील झाडीमुळे त्या प्रदेशात वाहाणाऱ्या वाऱ्यावरही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होत असतो. झाडी दाट असेल, तर वाऱ्याचा वेग वनप्रदेशात एकदम १० ते ६०% कमी होतो. जोरदार वाऱ्यांपासून वनप्रदेशाच्या आड असणाऱ्या शेतीच्या पिकांना अशा रीतीने उत्तम संरक्षण मिळते. तसेच सततच्या वाऱ्यामुळे मातीचे कण हवेत उडून धुळीच्या वावटळी उठणे व जमिनीची धूप होणे या क्रिया झाडी असलेल्या वनप्रदेशांमुळे रोखल्या जातात. विशेषतः उष्ण व कोरड्या हवेच्या प्रदेशात वनांच्या या उपयोगितेला फार महत्त्व आहे. तुफाने व चक्री वादळे यांपासून वनांमुळे परिणामकारक संरक्षण मिळते.

र्यावरणावर होणाऱ्या वनांच्या उपकारक परिणामांत जलनियमनाला सर्वांत महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. झाडी असलेल्या भूभागावर पडणाऱ्या पावसाचे पाणी हे एकदम जमिनीवर न पडता झाडांच्या पानांवर, डहाळ्यांवर, फांद्यांवर, खोडावर मग भूपृष्ठावर अशा क्रमाने खाली उतरत जाते. त्यानंतर हे पाणी हळूहळू जमिनीत मुरते. मुळे पाणी शोषून घेतात. या सर्वांमुळे पाण्याचा वेग नियंत्रित होतो. व मृदेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. हे पाणी यथावकाश जमिनीच्या सच्छिद्र वाटांद्वारे संथ व स्वच्छ झऱ्यांच्या व ओहोळांच्या रूपाने जमिनीच्या बाहेर पडते व ते प्रदीर्घ काळ टिकण्याची शक्यता असते. याउलट वनाच्छादन नसलेल्या जमिनीवर पडणाऱ्या वृष्टीचे पाणी विनाविलंब भूपृष्ठीवरून वाहू लागते व त्या ओघात तेथे असणारी मृदाही पाण्याबरोबर वाहून जाते. म्हणून पाणलोट क्षेत्रात सुस्थितीतील वने नसली, तर जोराच्या पावसामुळे मृदेचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर होते व मूळ ठिकाणाची झपाट्याने धूप होते. भारतात दरवर्षी सु. ५०० कोटी टन मृदा अशा तऱ्हेने वाहून जाते. पावसाळ्यात नदीनाल्यांना गढूळ पाण्याचे भयानक पूर येण्याचे व त्यापासून होणाऱ्या जीवित व वित्तहानीचे कारण मुख्यतः पाणलोट क्षेत्रातील वनांचा विध्वंस अथवा संपूर्ण अभाव हेच असते. मृदा मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने जलविद्युत् व सिंचन प्रकल्पांतर्गंत प्रचंड गुंतवणूक करून तयार केलेल्या जलाशयात अवाजवी गाळ साठून तेथील पाणी साठविण्याची क्षमता झपाट्याने कमी होते. असे धरणातील पाण्याचा साठा कमी होण्याचे प्रकार जगात अनेक ठिकाणी घडत आहेत. यावर पाणलोट क्षेत्रात वने राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

निसर्गनिर्मित अनेक वनस्पती व प्राणी यांचे अस्तित्व केवळ वनांवरच अवलंबून असते आणि अशा वनस्पती, पशुपक्षी, कीटक व जिवाणू यांचे आश्रयस्थान म्हणून वने अतिशय महत्त्वाची आहेत. वनांचा विध्वंस होऊन त्यांचे नैसर्गिक निवासस्थान नाहीसे झाल्यामुळे अनेक वन्य पशुपाक्ष्यांच्या जाती भूतलावरून निर्वंश झालेल्या आहेत. योग्य संरक्षण असणाऱ्या वनांत वनस्पती, प्राणी इत्यादींना आश्रय व निवारा तर मिळतोच, शिवाय अशा वनप्रदेशातील रमणीय निसर्गदृश्ये, शांतता व स्वच्छ वातावरण यांमुळे मानवी समाजाला विशेष मनोरंजन व विश्रांतीचे ठिकाण उपलब्ध होते; तसेच या नैसर्गिक जीवांच्या शास्त्रीय अभ्यासाला व संशोधनालाही येथे वाव मिळतो. यासाठीच अनेक देशांत निसर्गोद्याने, अभयारण्ये, वनोद्याने व राष्ट्रीय उद्याने म्हणून निवडक वने राखून ठेवलेली असतात. [ राष्ट्रीय उद्याने व संरक्षित नैसर्गिक प्रदेश].

No comments:

Post a Comment