Friday, 28 June 2013


व्यवसायाने शिक्षक असलेले श्री रघुनाथ गेनु राजापुरे हे मुळचे इतिहास प्रेमी होते,  ते ज्या गावात राहत होते ते गाव प्रतापगडाच्या पायथ्याला वसलेले होते गावाचे नाव पारसोंड मग अश्या ऐतिहासिक स्थळाच्या वातावरणात राहत असतांना राजापुरे गुरुजींना लिखाण करण्याची भावना निर्माण झाली. राजापुरे गुरुजीं गावातील अदिशक्ति श्री रामवरदायिनी देवीचे परमभक्त होते. त्यातूनच त्यांनी पारसोंड गावात निवास करत असलेली अदिशक्ति श्री रामवरदायिनी देवीच्या इतिहासाला सर्वात जास्त महत्व दिले आहे.  
श्री रामवरदायिनी देवीचा इतिहास लिहिताना त्यांनी अनेक पुराण, शोध ग्रंथांचा शोध घेवून पारच्या श्री रामवरदायिनीचे नेमके नाते कोणते याबाबत भाविकांना पुराव्यांसहित समजावून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी काही ऐतिहासिक कागदपत्रांचा, पुराव्यांचा, ग्रंथांचाही उपयोग केलेला आहे. अदिशक्ति श्री रामवरदायिनी देवीशी साम्य असलेल्या अनेक मूर्तींचे त्यांनी अवलोकन केले त्यांच्याशी संबंधीत काल्पनिक कथा, संकेत त्यांनी आभ्यासले आहेत. माहिती परिपुर्ण होण्यासाठी आवश्यक त्या संदर्भांचा व फोटोंचा त्यांनी आधार घेतला आहे.

अदिशक्ति श्री रामवरदायिनी देवीने अनेक प्रकारची रुपे घेऊन दैत्यांचा संहार केल्याच्या कथा देवीपुराणात आहेत. देवीने सूरक्षेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश यांनाही वर देऊन त्यांचे समाधान केले. ही कथ स्कंद पुराणातील  हरिहरेश्वर महात्म्य सावित्री प्रभाव आराण्यातील आहे.
कला काष्टादि कृपेने । परिणाम प्रदायिनी ॥
सूर श्रेष्ठांना वर देऊनी । जगती नाम वरदायिनी ॥


या वचनाप्रमाणे अदिशक्ती वरदायिनी ति न्ही देवांना वर देऊन त्यांचे संकट दूर केले.

आदिशक्तीची विविध रुपे  
आपल्या आपत्यांच्या संगोपनाची, संवर्धनाची जबाबदारी माता स्वीकारतेच याच न्यायाने सृष्टीतील सर्व प्राणी जातीच्या उत्पत्तीनंतर त्यांच्या संगोपनाची, संवर्धनाची जबाबदारी आदिमातांनी स्वीकारली. प्रांता-प्रांतात भावीकांनी आदिशक्तिच्या प्रतापांचे गुणगान करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपल्या भक्तांच्या इच्छेप्रमाणे तिने विविध रुपात त्यांना दर्शन दिले. ज्यांना ज्या रुपात ती दिसली त्याप्रमाणे तिची विविध रुपे तयार झाली. साधुंचे रक्षण व दुर्जनांचा नाश या धर्मस्थापनेच्या कार्याच्या दोन बाजु आहेत. या कार्यासाठी आदिशक्तींनी निरनिराळे आवतार घेतल, तशीच निरनिराळी शस्त्रे घेऊन दैत्यांचा नाश केला. दानवांची बाधा जेव्हां-जेव्हा होऊल तेंव्हा-तेंव्हा देव आवतार घेऊन शत्रूंचा नाश करतील असे आश्वासन स्वात: भगवंतांनी दिलेले आहे. म्हणूनच कोणत्याही आवताराची पूजा ही पर्यायाने श्रीशक्तीचीच पूजा आहे. आदिमाया शक्तीने संकट समयी ईश्वरी शक्तीचे प्रत्यय दाखवण्यासाठी जी प्रथम तीन रुपे घेतली ती गुणात्मक दृष्टिने प्रकट होऊन सत्व-रज-तम रुपाने साकार झाली. त्याचेच प्रत्यक्ष रुप अनुक्रमे महालक्ष्मी-महासरस्वती-महाकाली अशा या तीन रुपात प्रकट होऊन आणि  तीनही वेळा दानावांचा संहार करुन श्री शक्तीने देवांचे रक्षण केले.

तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राचे तिर्थक्षेत्र आहे. श्री तुळजाभवनी मातेची असामान्य अशी विशेषता म्हणजे देवी वीरांची, क्षत्रियांची देवता आहे. त्याचा कालानुरुप आढावा घेतला तर तो पुढिलप्रमाणे आहे.
  • कृतायुगात - अनुभूतिसाठी बनलेली महिषासुरमर्दिनी
  • त्रेतायुगात - प्रभुश्रीरामचंद्रास आशीर्वाद देणारी श्रीरामवरदायनी
  • द्वापारयुगात - धर्मराजास कृपाप्रसाद दिलेली दुर्गाभवानी  
  • कलयुगात - छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देऊन पाठीशी राहणारी तुळजाभवानी   

 पुढिल परिछेद पान क्रमांक 19-21 यातून घेणे.







1 comment: